घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट

एक जखमी, घरातील साहित्याचे नुकसान

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील पहापळ येथे घरगुती गॅस सिलिन्डरचा स्फोट झाल्याने घरातील वस्तुचे नुकसान झाले. यात कोणतीही जीवितहाणी झाली नसली तरी एक 25 वर्षीय युवक यात जखमी झालाये. शनिवारी रात्री पावणेआठ वाजताच्या दरम्यान ही घटना घडली.

पहापळ येथील वसंता मोहितकर यांच्या घरगुती वापरातील गॅस सिलिन्डरचा रात्री पावणे आठ वाजताच्या दरम्यान अचानक स्फोट झाला. यात त्यांचा मुलगा चेतन मोहितकर (25) हा जखमी झाला. या स्फोटामुळे घरातील सामानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

स्फोटात जखमी झालेला चेतन मोहितकरला उपचार करण्याकरिता मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहे. सध्या तरी जखमीची परिस्थिती धोक्याबाहेर असल्याची माहिती मिळाली आहे. या स्फोटात कोणताही जीवितहाणी झाली नसली तर यामुळे परिसरात दहशत पसरली आहे.

हे देखील वाचा:

शहरातील मुख्य बाजारपेठ होतेये हॉटस्पॉट

 

Lead StoryPahapal
Comments (0)
Add Comment