मुकूटबन येथे राज्य स्तरीय वर-वधू वर परिचय मेळावा

कोळी समाज संघटनेेकडून आयोजन

रफीक कनोजे, झरी: महर्षी श्री वाल्मिकी नवयुवक कोळी समाज संघटना,  मुकुटबन कडून दिनांक ७ जानेवारी रविवारला कोळी समाज उपवर वधू परिचय मेळावा आयोजीत केला आहे.

कोळी समाज विखुरलेला असल्याने कोण कुठे व काय नोकरी धंदा करीत आहे, याची अनेक समाज बांधवांना कल्पना नाही, त्यामुळे इच्छेप्रमाणे वधू वर मिळणे कठीण जाते याच संकल्पनेतून  महर्षी श्री वाल्मिकी नवयुवक कोळी समाज संघटनेकडून हा मेळावा आयोजित केला आहे.

मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संघटनेकडून अध्यक्ष रविंद्र तिपरतीवार, उपाध्यक्ष अनिल कुंटावार , सचिव  रवींद्र कापनवार  व जिन्नावार यांनी आवाहन केले आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य कोळी महासंघ रमेशदादा पाटील , गृहराज्यमंत्री  हंसराज अहिर, अध्यक्ष तेलंगणा राज्य डॉ बंडप्रकाश मुदिराज व आमदार संजीवरेडी बोदकुरवार यांची उपस्थिती  राहणार आहे.

Comments (0)
Add Comment