मुलचंद महाराज तुगनायत यांचे निधन

उद्या सकाळी 10 वाजता होणार अंत्यसंस्कार

जितेंद्र कोठारी, वणी: येथील प्रख्यात नाक, कान, घसा तज्ज्ञ डॉ. नंदकिशोर तुगनायत व ह.भ.प. मुन्ना महाराज तुगनायत यांचे वडील मुलचंद महाराज तुगनायत यांचे वयाच्या 98 व्या वर्षी वृद्धपकाळाने निधन झाला.

जैताई मातेचे परमभक्त मुलचंद महाराज यांची प्रकृती मागील दोन वर्षांपासून अस्वस्थ होती. त्यांची अंत्ययात्रा गुरुवार 7 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता त्यांच्या राहत्या घरून वणी मोक्षधामसाठी निघणार आहे.

त्यांच्या मागे चार पुत्र मुन्नालाल महाराज, डॉ. नंदकिशोर, ऍड. जुगलकिशोर, प्रो. राजकिशोर दोन पुत्री श्रीमती कलावती बल्लभदास चौबे, श्रीमती कल्पना कमलकिशोर शर्मा व नातवंड असा मोठा आप्त कुटुंब आहे. वणी बहुगुणी परिवारातर्फे मुलचंद महाराज यांना श्रद्धांजली.

हेदेखील वाचा

स्थानिक पत्रकारांच्यावतीने पत्रकारदिन साजरा

हेदेखील वाचा

साई लॅपटॉप व कॉम्प्युटर गॅलरीमध्ये मकरसंक्रांती ऑफर

funeralLead StoryMaharajmoremulchandnoThursdaytugnayat
Comments (0)
Add Comment