वीज ग्राहकांना जादा देयकाचा दिवाळी बोनस

डोलडोंगरगावात अनेकांना लाखोचे बिल

नागेश रायपुरे, मारेगाव : तालुक्यातील डोलडोंगरगांव येथील अनेक घरगुती वीज ग्राहकांना लाखो रूपयांचे मासिक बिल आले. यामुळे जणू काही वीज वितरण कंपनीकडून ग्राहकांना जादा देयकाचा दिवाळी बोनस मिळाला असल्याचा रोष वीड ग्राहक करत आहेत. बिल न भरल्यास लाईन कट करण्याची धमकी वीज कर्मचाऱ्यांकडून मिळत आहे.

डोंगरगाव येथील अजाबराव बोडने यांना 111.690/-, अरुण मंदादे यांना 52270/-,सुभाष मधुकर सपरे यांना 44320/-,सोणाबाई लेंनगुडे 25000/-,अधिक आत्राम 19000/-,राजू गुरनुले 15000/- आदी जवळपास विसच्या वर घरगुती वीज ग्राहकांना येणारे बिल अवाढव्य आहे. बिल न भरल्यास वीज पुरवठा बंद करण्याची धमकी कर्मचाऱ्यां कडून मिळत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये रोष व्यक्त होऊन ऐन दिवाळीच्या तोंडावर जादा बिलाचा दिवाळी बोनस दिल्याने परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले. वीज वितरणाच्या भोंगळ कारभाराला नागरिकाना तोंड द्यावे लागत आहे. याची योग्य चौकशी
करुन बील कमी करण्याची मागणी होत आहे.

DiwaliElectircity BillLead StoryMSEDlveej
Comments (0)
Add Comment