वंचितची तालुका कार्यकारिणी जाहीर; अध्यक्षपदी दिलीप भोयर

प्रल्हाद चामाटे, सतीश गेडाम यांची महासचिवपदी निवड

जब्बार चीनी, वणी: वंचित बहुजन आघाडीची वणी तालुक्याची कार्यकारणी नुकतीच गठीत करण्यात आली. यात दिलीप भोयर यांची तालुकाध्यक्षपदी तर प्रल्हाद चामाटे व सतीश गेडाम यांची तालुका महासचिवपदी निवड करण्यात आली. या जम्बो कार्यकारणीत एकूण 44 जणांचा समावेश आहे.

उपाध्यक्ष म्हणून बाळू निखाडे, निशिकांत पाटील, प्रकाश मुन, सचिन वानखेडे, रमेश वाढई, ज्ञानेश्वर मोहिते, नरेंद्र लोणारे, सुमित सोनटक्के, तर सचिव म्हणून सचिन मडावी, तर सहसचिव म्हणून लक्ष्मणराव वानखडे, अनिल खोब्रागडे, निखिल चाफले, गजानन गोंडे, प्रवीण उपरे, बाळू लोणारे, तर संघटक म्हणून ओमेश परेकर, व कोषाध्यक्ष म्हणून अनिल पथाडे यांची निवड करण्यात आली.

विधी सल्लागार म्हणून एड. चंदू राऊत, तर मार्गदर्शक म्हणून जिया अहेमद, राजू लोहकरे, प्रा. राम ठमके तर महिला संघटिका म्हणून चंद्रकला उराडे, सुजाता नगराळे, तर सदस्य म्हणून बुद्धिराम तेलंग, संतोष चिडे, महादेव बुरडकर, संजय बावणे, भास्कर नगराळे, शंकर भगत, मोरेश्वर देवतळे, पुखराज खैरे, हरवर्धन खैरे, शारदा मेश्राम, प्रतिभा मडावी, ताई टोंगरे, संगीता वानखडे, विमल सातपुते, सीमा वानखडे, वर्षा उईके, रेखा पाटील, वैशाली गावंडे यांचा समावेश आहे,

या निवडी बद्दल जिल्हाउपाध्यक्ष मंगल तेलंग, मिलिंद पाटील, एड, विप्लव तेलतुंमडे, भरत कुमरे, किशोर मुन, कपिल मेश्राम यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे.

सर्वांना सोबत घेऊन काम करेल – दिलीप भोयर
वंचित बहुजन आघाडीने जी जबाबदारी मला दिली आहे त्यात निश्चितपणे सर्वांना सोबत घेऊन शोषित, पीडित, गोरगरीब जनतेच्या हक्कासाठी सदैव तात्पर्यतेने कार्यरत राहील. पक्षाचे नेते ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांचा विश्वासाला कुठं ही तडा जाऊ देणार नाही.
– दिलिप भोयर, नवनिर्वाचीत तालुका अध्यक्ष, वंचित आघाडी

वंचित बहुजन आघाडीने जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत लोडगे यांचे अध्यक्षतेखाली व जिल्हा महासचिव एड. श्याम खंदरे यांच्या उपस्थितीत दोन महिन्याआधी बैठक व मुलाखती घेण्यात आल्या होती. त्यानुसार संभावित कार्यकारणी पक्षाचे नेते ऍड. प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडे पाठविण्यात आले होती. त्यावरून सदर कार्यकारिणी जाहीर कऱण्यात आली आहे.

Lead StoryVanchit Adhadi
Comments (0)
Add Comment