गळफास घेऊन युवतीची आत्महत्या

वणीतील एमआयडीसी परिसरातील घटना

विवेक तोटेवार, वणी: मंगळवारी 2 जुलै रोजी घरातून निघून गेलेल्या लालगुड्यातील एम आय डी सी परिसरात एका 21 वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. बुधवारी याबतची माहिती तिच्या कुटुंबियांना मिळाली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

वणीतील एम आय डी सी परिसरात मृतकाचे वडील, आई, दोन मुली व एक मुलगा व आजी आजोबा असा आप्तपरिवर मिळून राहतो. मंगळवारी अचानक दुपारी 1 वाजताच्या सुमारास त्यांची धाकटी मुलगी नेहा चंद्रशेखर लिल्हारे (21) घरातून निघून गेली. त्याच दिवशी आजी व वडील रामटेक येथे जाणार होते. परंतु त्या दिवशी नेहाच्या भावाने कुठे गेली असेल म्हणून लक्ष दिले नाही. परंतु सायंकाळी जेव्हा नेहा आली नाही तेव्हा त्यांनी शोध घेण्यास सुरुवात केली. परंतु नेहाचा कुठेही थांगपत्ता लागला नाही.

दुसऱ्या दिवशी दुपारी बकऱ्या चारावयास गेलेल्या एक व्यक्तीला नेहाचा मृतदेह काजूच्या झाडाला लटकलेला दिसला. नेहाच्या कुटुंबीयांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. बघितले तर नेहाने एक काजूच्या झाडाला आपल्या ओढणीने गळफास लावलेला दिसून आला. घटनेनंतर तत्काळ वणी पोलिसांन याची माहिती देण्यात आली. वणी पोलिसांनी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनाकरिता दाखल केले. आत्महत्यचे कारण समजू शकले नाही. घटनेचा पुढील तपास वणी पोलीस करीत आहे.

Lead StoryMIDCWani
Comments (0)
Add Comment