मुलगा होत नाही म्हणून विवाहितेचा छळ

पती, सासू व सास-यांविरोधात गुन्हा दाखल

जितेंद्र कोठारी, वणी: मुलगा होत नाही म्हणून विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्या प्रकरणी पती, सासू व सासऱ्यांसह पाच जणांविरुद्ध वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दशरथ ननकवा केवट (35), ननकवा मातादिन केवट (55), सुघरीया ननकवा केवट (50) रा. भांदेवाडा ता. वणी व राम केवट (45), गैयश्रीया राम केवट (40) रा. घुग्गुस, जि. चंद्रपूर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे की संगीता दशरथ केवट (30) रा. भांदेवाडा ता. वणी येथील रहिवाशी आहे. त्यांचे घुग्गुस येथील दशरश केवट यांच्याशी लग्न झाले आहे. तिला 4 मुली आहे. दरम्यान मुलगा झाला झाला नाही म्हणून पती, सासू व सासरा तिला नेहमी शारीरिक व मानसिक त्रास देत होते. तसेच माहेरून 2 लाख रुपये आणण्यासाठी दि. 4 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजता दरम्यान तिला मारहाण केली.

पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी दशरथ ननकवा केवट (35), ननकवा मातादिन केवट (55), सुघरीया ननकवा केवट (50) रा. भांदेवाडा ता. वणी व राम केवट (45), गैयश्रीया राम केवट (40) रा. घुग्गुस, जि. चंद्रपूर विरुद्द कलम 498(अ), 323, 504, 506, 34 भादंवि गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनात सफौ जगदीश बोरनारे करीत आहे.

हे देखील वाचा:

शेतकरी विरोधी कृषी कायदे मागे घ्या

घरचे गेले कामानिमित्त बाहेर, मुलीने केली आत्महत्या

CrimeLead Story
Comments (0)
Add Comment