आज तालु्क्यात कोरोनाचे 5 रुग्ण

तालुक्यात ऍक्टिव्ह रुग्ण झालेत 26

जब्बार चीनी, वणी: आज रविवारी दिनांक 1 नोव्हेंबर रोजी तालुक्यात कोरोनाचे 5 रुग्ण आढळून आलेत. आज आलेले रुग्ण रॅपिड ऍन्टिजन टेस्टनुसार पॉजिटिव्ह आले आहे. पॉजिटिव्ह व्यक्ती गणेशपूर 3
सेवा नगर 1, जि. प. कॉलनी 1 असे आहेत. आज आलेल्या कोरोनाच्या रुग्णांमुळे तालुक्यात एकूण रुग्णसंख्या 778 झाली आहेत.

आज 14 जणांची रॅपिड ऍन्टिजन टेस्ट करण्यात आली. आज 19 संशयीतांचे स्वॅब यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. अद्याप यवतमाळहून 59 अहवाल येणे बाकी आहे.

तालुक्यात 26 ऍक्टिव्ह रुग्ण
सध्या तालुक्यात एकूण 778 पॉजिटिव्ह रुग्ण झालेत. यातील 749 व्यक्ती कोरोनावर मात करून रिकव्हर झाले आहेत. आज एकही कोरोनामुक्त रुग्ण नाही. सध्या तालुक्यात 26 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील 14 जण होम आयसोलेट आहेत.

12 जणांवर परसोडा येथील कोविड केअर सेंटरमध्ये तर 4 रुग्णांवर यवतमाळ येथे उपचार सुरू आहे. कोरोनामुळे तालु्क्यात मृत्यूची संख्या 20 झाली आहे.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

COronaCovid 19FiveLead StoryPatientsReportsunday
Comments (0)
Add Comment