काँग्रेस कमिटीतर्फे स्व. इंदिरा गांधी यांना अभिवादन

इंदिरा गांधी याच ख-या आर्यन लेडी, इजहार शेख यांचे प्रतिपादन

जितेंद्र कोठारी, वणी: वणी शहर काँग्रेस व सेवादल तर्फे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला हार टाकून अभिवादन केले. यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत देखील व्यक्त केले.

31 ऑक्टोबर या दिवशी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी असते. सकाळी शहरातील इंदिरा चौकात काँग्रेस कमेटी व सेवादलाचे पदाधिकारी, कार्यकर्ते अधिवादनासाठी गोळा झाले. यावेळी कार्यकर्त्यांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला हारार्पण केले. त्यानंतर 2 मिनिटे मौन बाळगून आदरांजली व्यक्त करण्यात आली. मान्यवरांनी यावेळी मनोगतही व्यक्त केले.

इंदिरा गांधी याच ख-या आर्यन लेडी – इजहार शेख
देशाने इतके पंतप्रधान बघितले. मात्र त्यात सर्वात खंबीर नेतृत्त्व म्हणून इंदिरा गांधी यांचे नाव अग्रस्थानी आहे. त्यांनी घेतलेल्या दूरदृष्टीच्या धाडसी निर्णयाने सामान्य माणसाला आजपर्यंत लाभ मिळत आहे. बँकांचे राष्ट्रीयीकरण, हरित व पर्यावरण क्रांती, बांगलादेश निर्मिती असे महत्त्वपूर्ण निर्णय घेणार्‍या स्व. इंदिराजींचे नेतृत्व देशासाठी नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर खंबीर ठरले. त्यामुळे त्या ख-या अर्थाने आर्यन लेडी ठरतात.
– इजहार शेख, जिल्हा उपाध्यक्ष

या वेळी प्रमोद निकुरे शहराध्यक्ष, प्रमोद वासेकर तालुकाध्यक्ष, इजहार शेख जिल्हा उपाध्यक्ष, ओम ठाकूर, राजाभाऊ पाथ्रडकर, प्रमोद लोणारे अध्यक्ष शहर सेवादल, डॉ मोरेश्वर पावडे, अनंत चौधरी, सुधीर खंडाळकर, सुरेश बन्सोड, रफिक रंगरेज, बाबाराव गेडाम, राजेंद्र खोब्रागडे, ज्योती सुर, संध्या बोबडे, मंगला झिलपे, वंदना धगडी यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Congressijhar ShaikhLead Storysevadal