मारेगाव तालुक्यातील पात्र मतदारासाठी विशेष नोंदणी मोहीम

नोंदणीसाठी तहसीलदारांचे आवाहन

नागेश रायपुरे, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील सर्व मतदान केंद्रावर दिनांक 30 सप्टेंबर ते 14 ऑक्टोंबर 2018 या कालावधीत पात्र मतदारासाठी नोंदणी विशेष मोहीम राबविण्यात येत असून या मतदार मोहिमेत सर्व तरुण पात्र मतदारांनी आपले नाव नोंदणी करण्याचे आवाहन सहा.मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार मारेगाव विजय साळवे यांनी केले आहे.

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने या विशेष मोहिमे अंतर्गत मतदार नाव नोंदणीसह मतदार यादी अद्यावत करण्यावर विशेष भर देवून मतदार यादी त्रुटी विहित तयार करण्याची कार्यवाही सुरु आहे मतदान केंद्राचे सुसूत्रिकरनागत तालुक्यात मतदान केंद्राचे नव्याने निर्मिति करण्यात आली असून तालुक्यात मतदान केंद्राची संख्या 71 वरुन 74 झाली आहे.

मतदार नोंदणी विशेष मोहीम 30 सप्टेंबर ते 14 आक्टोम्बर 2018 या कालावधि पर्यन्त सर्व मतदान केंद्रावर ही मोहीम राबविण्यात येत असून करिता 1 जानेवारी 2019 या अहर्ता दिनाकावर 18 वर्ष पूर्ण तरुण पात्र मतदारांनी नमूना 6 सोबत वयाच्या पुरावा,रहिवासी दाखला,रंगीत पास पोर्ट फोटो जोडून आपली नोंदनी करावी असे आवाहन सहा.मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार विजय साळवे,निवडनुक निर्णय अधिकारी दासरवार यांनी केले आहे.

 

Lead StoryMaregaonmohimregistrationvoter
Comments (0)
Add Comment