वणी: वणी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांची बदली करण्यात आली आहे. १ सप्टेंबर २०१६ रोजी राहुल मदने वणी उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून रुजू झाले होते. राहुल मदने यांची हिंगोली शहर उपविभाग येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून बदली झाली आहे.
राहुल मदने यांच्या जागी उप विभागीय पोलीस अधिकारी म्हणून पुणे येथील गुन्हे अन्वेषण विभागातील अप्पर पोलीस अधीक्षक विजय लगारे येणार आहे. असा आदेश गृहविभागाने काढला आहे.