वणीतून चंद्रपुरात जाणारी अवैद्य दारू जप्त

अवैध दारू तस्करीला कुणाचं पाठबळ ?

वणी: मंगळवारी वणी पोलिसांनी चंद्रपूरला जाणारी अवैध दारू जप्त केली. यावेळी पोलिसांनी देशी दारूच्या 90 मीलीच्या 100 बॉटल्स जप्त केल्या आहे. इंदिरा चौकात ही घटना घडली. यात आरोपी राजू गोपाल दास (27) राहणार शाम नगर, भगतसिंग चौक बंगाली कॅम्प चंद्रपूर याला अटक केली आहे.

सविस्तर वृत्त असे की, आरोपी राजू हा शहरातील खाती चौकातून चंद्रपूरला जात होता. वाहतूक पोलीस नीलेश कुम्भलकर यांना आरोपी राजूचा संशय आला. त्यांनी राजू याची तपासणी केली असता त्याच्या बॅग मधे दारुच्या बाटल्या आढळल्या. त्यांनी त्याला लगेच ताब्यात घेतले. त्याच्यावर दारुबंदी कलम 65 इ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चंद्रपूर जिल्हा दारूबंदीचा जिल्हा असल्याने वणी शहरातून चंद्रपुरात नेहमीच दारू नेली जाते. अनेकांना अवैधरित्या दारू घेऊन जाताना अटक करण्यात आली आहे. या अवैध दारु तस्करीला कुणाचं पाठबळ आहे असा प्रश्न विचारला जातोय.

daruIlligal liquorWani police
Comments (0)
Add Comment