भास्कर राऊत, मारेगाव: मारेगाव येथून काम आटपून गावी परतत असताना एका मजुराला अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. यात तो जागीच ठार झाला. शुक्रवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास मारेगाव-करंजी रोडवरील शिवनाळा फाट्याजवळ ही घटना घडली. मृतकाचे नाव अनिल कृष्णराव टेकाम (26) असून शिवनाळा येथील रहिवासी होता.
अनिल हा गवंडी काम करायचा. शुक्रवारी दिनांक 30 जून रोजी नेहमी प्रमाणे तो मारेगाव येथे गवंडी कामासाठी गेला होता. काम आटोपल्यानंतर रात्री तो एका खासगी वाहनाने गावी परत जाण्यासाठी निघाला होता. तो शिवनाळा फाट्यावर उतरला.
फाट्यावरून तो पायदळ रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करीत होता. दरम्यान पाठीमागून येणा-या एका अज्ञात वाहनाने धडक दिली. यात अपघातात तो जागीच ठार झाला. अपघात होताच वाहन चालक घटनास्थळावर न थांबता निघून गेले. अनिल याच्या पश्चात विधवा आई व बहिण आहे.
अपघाताची माहिती मिळताच मारेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी घटनेचा पंचनामा केला. मारेगाव पोलीस अज्ञात वाहन चालकाचा शोध घेत आहे.
हे देखील वाचा:
आपण सततच्या ऍसिडिटीने त्रस्त आहात? वाचा सर्जन डॉ. आशुतोष जाधव यांचा ब्लॉग
मूळव्याध म्हणजे काय? मुळव्याध कसा बरा होतो… वाचा सर्जन डॉ. आशुतोष जाधव यांचा ब्लॉक