बहुगुणी डेस्क, वणी: या वर्षीचा सर्वात बहुचर्चित चित्रपट सम्राट पृथ्वीराज शुक्रवारी दिनांक 3 जून रोजी रिलिज होत आहे. हा सिनेमा वणीकरांना सुजाता थिएटरच्या फुल्ली एसी, लक्झरीयस वातावरणात व डॉल्बी डिजिटल सराउंड साउंड सिस्टिममध्ये बघता येणार आहे. या सिनेमाचे रोज 5 शो होणार आहेत. चित्रपटात अक्षय कुमार प्रमुख भूमिकेत म्हणजे सम्राट पृथ्वीराज चौहानच्या भूमिकेत दिसणरा आहे. तर मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर या चित्रपटातून पदार्पण करणार आहे. तर संजय दत्त आणि सोनू सूद देखील या चित्रपटात मोठ्या भूमिकेत आहेत. सध्या या चित्रपटाचा फर्स्ट रिव्ह्यू आला असून यात अक्षयच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक होत आहे. अनेक चित्रपट समिक्षकांनी या चित्रपटाला 5 पैकी 4 स्टार दिले असून हा सिनेमा या वर्षीचा सर्वात मोठा सिनेमा असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. पहिल्या दिवशी तसेच शनिवार व रविवारी प्रेक्षकांची तिकीट न मिळाल्यास निराशा होऊ नये यासाठी या सिनेमाची तिकीट बुकिंग सुरू करण्यात आली आहे. शिवाय हा चित्रपटाचे रोज 5 शो होणार आहे. यात दु. 11 वा, दु. 1.30 वा, दु. 4 वा. संध्याकाळी 6.45 वा. व रात्री 9.30 वाजता शो होणार आहेत. प्रेक्षकांनी निराशा टाळण्यासाठी आजच आपले तिकीट बुक करा असे आवाहन करण्यात आले आहे.
पृथ्वीराज चौहान हे 12 व्या शतकाच्या उत्तरार्धातील सम्राट असून त्यांनी अजमेर व दिल्लीच्या तख्तावर राज्य केले होते. पृथ्वीराज चैहान यांचे कन्नोजचे राज जयचंद यांची मुलगी संयोगिता हिच्यावर प्रेम होते. संयोगिताच्या स्वयंवराच्या वेळीच पृथ्वीराज चौहान यांनी पळवून नेले व लग्न होते. या पराक्रमी राजाने मोहम्मद घोरी ला 17 वेळी पराजीत केले आहे. मात्र 18 व्या वेळी घोरीने पृथ्वीराज चौहान यांचे सासरे राजा जयचंदची मदत घेऊन पृथ्वीराज चौहान यांना पराजीत केले. त्यांच्या पराक्रमाच्या कथा आजही गावोगावी ऐकविल्या जातात. यावर सुप्रसिद्ध दिग्दर्शक चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी सम्राट पृथ्वीराज हा सिनेमा बनवला आहे. या वर्षीचा हा सर्वात चर्चीत व बिग बजेट सिनेमा मानला जात आहे.
कशी कराल बुकिंग?
आपल्याला शो सुरू होण्याच्या आधी टॉकीजमध्ये जाऊन तिकीट बुक करता येईल शिवाय बुक माय शो (येथे क्लिक करा) पेटीएम वरूनही आपल्याला बुकिंग करता येते. व्हॉट्सऍपवरूनही तिकीट बुक करण्याची सुविधा उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल.
फॅमिलिसह लुटा सिनेमाचा आनंद
सुजाता थिएटर हे आधी शाम टॉकिज नावाने शहरात सुपरिचित होते. दोन वर्षाआधी सुजाता टॉकीजचे रिनोव्हेंशन करण्यात आले. त्यामुळे टॉकीजचा चेहरामोहरा बदलून आता तिथे लक्झरी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण थिएटर हे एसी आहे. बालकणी सुविधाही आहे. फॅमिलीसाठी वेगळी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. संपूर्ण थिएटरमध्ये डॉल्बी व साउंड सराउंड ही अत्याधुनिक साउंड सिस्टिम बसवण्यात आली आहे. त्यामुळे आपल्याला चित्रपटाचा खरा आनंद अनुभवायला मिळतो. त्यामुळे लवकरात लवकर तिकीट बुकिंग करून आपली सिट रिझर्व करावी असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल.
पेटीएमवरून तिकीट बुक करण्यासाठी येथे क्लिक करा…