आज केयर फार्मसी स्टोअर्स (मेडिकल) चे होणार उद्घाटन

बहुगुणी डेस्क, वणी: शहरातील यवतमाळ रोड जवळील बाकडे पेट्रोल पम्प जवळील ट्रु केअर क्लिनिक या हॉस्पिटल आवारात असलेल्या केअर फार्मसी स्टोअर्स या मेडिकल स्टोअर्सचे आज दिनांक 1 जून रोजी उद्घाटन होत आहे. या मेडिकल स्टोअरमध्ये सर्व प्रकारच्या मेडिसिन्स उपलब्ध आहे. तसेच मेडिकलच्या उद्घाटन निमित्ताने जनरल फिजिशिअन डॉ. जमील अहमद (DHMS, Mumbai) यांचे दर रविवारी फ्री मेडिकल चेकअप कॅम्प होणार आहे. या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा परिसरातील रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. 

सदर कॅम्पमध्ये रुग्णांची तपासणी करून विविध रोगांचे निदान केले जाणार आहे. याशिवाय बीपी, शुगर आणि ईसीजी देखील केली जाणार आहे. सदर शिबिर केवळ स. 10 ते दु. 3 व संध्या 5 ते रात्री 8 पर्यंत सुरू राहणार आहे. तर ट्रु केअर क्लिनिक येथील रोजच्या ओपीडीचा वेळ हा रोज सकाळी 9 ते 1 व दुपारी 3 ते 8 वाजेपर्यंत राहणार आहे. 

मेडिकलच्या उद्घाटन कार्यक्रमानिमित्त आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा वणी व परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. एस जमील अहमद यांनी केले आहे.

पत्ता:  ट्रु केअर क्लिनिक, एस डी कॉम्प्लेक्स, बाकडे पेट्रोल पम्प समोर, यवतमाळ रोड वणी, जिल्हा यवतमाळ

Lead StoryTrue Care Hospital WaniTrue Medical