बहुगुणी डेस्क, वणी: दिवंगत खा. सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त वणीत अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले. छ. शिवाजी महाराज चौक (टिळक चौक) येथे पुष्पार्पण व मेनबत्ती प्रज्वलित करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी बाळू धानोरकर यांच्या आठवणींना उजाळा दिला. बाळूभाऊ हे सर्वसामान्यांचे नेतृत्व होते. जनतेच्या प्रश्नांसाठी ते कायम जागरूक राहत. प्रसंगी जनतेच्या प्रश्नांसाठी ते आक्रमक देखील होत. त्यांच्या कार्यामुळे ते माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांचे प्रेरणास्थान होते, असे मनोगत संजय खाडे यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाला वामनराव कासावार, ऍड देविदास काळे, पुरुषोत्तम आवारी, शंकर व-हाटे, प्रमोद वासेकर, तेजराज बोढे, राजू अंडेलवार, विवेक मांडवकर, नरेंद्र ठाकरे, प्रशांत गोहोकर, आशिष खुलसंगे, घनश्याम पावडे, सुरेश रायपुरे, वंदना आवारी, आशा टोंगे, साधना गोहकर, शारदा ठाकरे, संगीता खाडे, संध्या बोबडे, मंदा बांगरे, शामा तोटेवार, काजल शेख, सुनील वरारकर, वामनराव कुचनकर, मुकुंद एकरे, पुंडलिक धोबे, पलाश बोढे, उदय रायपुरे, सुरेश बनसोड, प्रमोद लोणारे, विकेश पानघाटे, पंडीले गुरुजी, कोरडे गुरुजी यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते तथा नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.