बहुगुणी डेस्क, वणी: शहरातील आदर्श प्रशासकीय महाविद्यालयात महाराष्ट्र दिन व कामगार दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच पोलीस भरती परीक्षेत यशस्वी विद्यार्थांचा सत्कार देखील करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष संचालक रविद्र गौरकार, तर प्रमुख पाहुणे म्हणून केराम, उज्वला गौरकार, प्राचार्य निशांत खोब्रागडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
नुकत्याच पार पडलेल्या पोलीस भरती परीक्षेत यवतमाळ जिल्ह्यातील इतर मागासवर्गीय प्रवर्गातून उत्तीर्ण आशिष गोखरे व चंद्रपूर जिल्हा पोलिस विभागातून उत्तीर्ण कु. तेजस्वी गारघाटे यांचा शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी रविंद्र गौरकार यांनी मनोगत व्यक्त करीत विद्यार्थ्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचलन पुरुषोत्तम नवघरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार उज्वला गौरकार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अमित काळे, राहुल झाडे आदींनी सहकार्य केले. यावेळी विद्यार्थी व कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.