बहुगुणी डेस्क, वणी: वणीतील महालक्ष्मी स्टडी सर्कलमध्ये प्रोफेशनल मेकअप व हेअर स्टायलिंग वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे. सुप्रसिद्ध मेकअप व हेअर स्टायलिस्ट ज्योती खटले हे या शिबिराच्या प्रमुख ट्रेनर आहेत. सदर शिबिर हे 10 मे पासून सुरू होणार असून हे शिबिर 1 महिन्याचे आहे. दुपारी 12 ते 2 या वेळेत हे प्रशिक्षण होणार आहे. हे व्यावसायिक शिबिर केल्यानंतर हेअर स्टायलिंग आणि मेकअप क्षेत्रात करिअरची संधी उपलब्ध होणार आहे.
सदर शिबारात मेकअपचे विविध प्रकार, वधु मेकअप, आय मेकअप, फेस काउंटरिंग, डार्क स्किन मेकअप, करेक्टिव्ह मेकअप, प्रॉडक्ट इन्फॉर्मेशन, स्किन केअर, मेकअप थेअरी इत्यादी टॉपिक कव्हर केले जाणार आहे. तसेच लाईव्ह प्रॅक्टिकल आणि डेमोद्वारा शिबिरार्थ्यांना ट्रेनिंग दिले जाणार आहे.
या वर्कशॉपसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून केवळ पहिले येणा-या मोजक्या उमेदवारांनाच या प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी तातडीने अधिक माहितीसाठी संपर्क साधावा असे आवाहन सॅसी अकाडमीतर्फे करण्यात आले आहे.
अधिक माहिती साठी संपर्क:
9130936340 8600383888
वर्कशॉपचे ठिकाण: महालक्ष्मी स्टडी सर्कल, घर संसार सेल समोर वणी