तालुका प्रतिनिधी, वणी:मेंढोली येथील ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्थेची निवडणूक शनिवारला मेंढोली येथे पार पडली. यात ऍड.विनायक ऐकरे यांच्या नेतृत्वातील ग्रामविकास आघाडीचे 13 पैकी 13 उमेदवार विजयी झाले. तर डॉ. भाऊराव कावडे आणि सरपंच पवन ऐकरे यांच्या रामाजी बाबा शेतकरी गटाचा पराभव झाला. या गटाला एकही जागा जिंकता आली नाही.
वणी तालुक्यातील मेंढोली येथील ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्थेची सन 2022 ते 2027 या कालावधीसाठी निवडणूक शनिवारला पार पडली. 13 सदस्य असलेल्या संस्थेत ग्रामविकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडून आले. सर्वसाधारण कर्जदार गटातून नत्थू विठूजी उलमाले, विनोद वासुदेव कुचनकर, रवींद्र पुंडलिक खाडे, ईश्वर जनार्दन वासेकर, विलास पांडुरंग पाचभाई, पुंडलिक नारायण पाचभाई, दीपक सुधाकर बलकी, माधव हरिश्चंद्र खाडे खाडे,
इतर मागास वर्गामधून प्रवीण रामदास ऐकरे, अनुसूचित जाती- जमाती गटातून महेश गोसाई येलादे तर महिला राखीव गटातून रजनी पंढरीनाथ ऐकरे, मालन भाऊराव गोरे यांचा बहुमतांनी विजय झाला. भटक्या जाती-जमाती गटातून देवराव विठू गोरे बिनविरोध निवडून आले.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आर. टी. शेंद्रे, केंद्राध्यक्ष डी. एस. मेश्राम, मतदान अधिकारी म्हणून एम. एस. भोयर यांनी काम पाहिले. ग्रामविकास आघाडीच्या विजयासाठी ऍड. विनायक ऐकरे, सुधाकर बलकी, पंढरी ऐकरे, सूर्यभान कुचनकर, प्रवीण ऐकरे आदींनी परिश्रम घेतले.
हे देखील वाचा