बहुगुणी डेस्क, वणी: किशोर वय फार अल्लड असतं. या वयात कोणतीही चूक होऊ शकते. नेमकी तीच चूक झाली. परिसरातील ती युवती एका मुलाच्या प्रेमात पडली. दोन वर्ष हे प्रेम प्रकरण चांगलं चाललं. नंतर मात्र काहीतरी बिनसलं. त्याचा सूड त्या युवकाने घेतला. त्या युवतीचे त्याने अश्लील फोटोशूट केलेत आणि सोशल मीडियावर व्हायरल केलेत. मात्र बॉयफ्रेंडने केलेली बदमाशी असह्य झाल्याने अखेर प्रेयसीने पोलीस ठाणे गाठून याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपीच्या हैदराबाद येथून मुसक्या आवळल्या.
प्राप्त माहितीनुसार, प्रेयसी (22) ही वणी तालुक्यातील रहिवासी असून प्रियकर (28) हा मारेगाव तालुक्यातील रहिवासी आहे. दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. त्यामुळे हे दोघे एकमेकांना नेहमी भेटत. आयुष्याच्या जीवनसाथी होण्याची प्रतिज्ञाही त्यांनी घेतली. मात्र या परिवारातील एकाचा या लग्नाला विरोध होता. हे दोघे एकमेकांना नेहमी भेटत. आयुष्याच्या जीवनसाथी होण्याची प्रतिज्ञाही त्यांनी घेतली. मात्र या परिवारातील एकाचा या लग्नाला विरोध होता. त्यामुळे आरोपीने लग्नास नकार दिला.
एवढ्यावरच ती युवती खचली नाही. तिने आपले लक्ष संपूर्णपणे शिक्षणावर केंद्रित केले. मात्र एक दिवस अघटीत घडले. त्या युवतीला आरोपीने वाटेत गाठले. चाकूचा धाक दाखवला. काही महत्त्वाचे बोलायचे आहे, असे म्हटले. त्याच्या बाईकवर त्याने तिला जवळच्या जंगलात नेले. त्यानंतर त्या मुलीचे नको ते फोटो काढलेत. आपले लग्न झाले असल्याचे त्यांने जबरदस्तीने कबूल करून घेतले. अखेर त्या मुलीला वणीतील एका चौकात आणून सोडले. घरीच व्हिडिओ कॉल करून तिला विवस्त्र होण्यास सांगितले.
या व्हिडिओचे स्क्रीन शॉट काढून त्याने सोशल मीडियावर व्हायरल केलेत. याची तक्रार त्या युवतीने पोलीस ठाण्यात दिली आहे. नंतर मारेगाव पोलीस सतर्क झालेत. पोलीस उपनिरीक्षक डॉ. ज्ञानेश्वर सावंत राजू टेकाम यांनी आरोपीला हैदराबाद येथून अटक केली. त्याच्यावर कलम 354 (क ), 376 (2)( n )तसेच सहकलम 66 (e) नुसार गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली अजय वाभिटकर करीत आहेत.