कायरजवळ मालगाडी रुळावरून घसरली

जब्बार चीनी, वणी: कायर रेल्वे स्टेशनजवळ मालगाडीचे 12 डब्बे रुळावरून घसले. संध्याकाळी 6 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. सुदैवाने यात कोणतीही हानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच अधिकारी घटनास्थळी रवाना झाले. दरम्यान बघ्यांची एकच गर्दी घटनास्थळी जमली होती,

सदर मालगाडी घुग्गुसहून सोलापूर एनटीपीसीच्या दिशेने जात होती. संध्याकाळी 5.25 मिनिटांनी ही मालगाडी वणीहून अदिलाबादच्या दिशेने निघाली. दरम्यान कायर रेल्वे स्टेशनजवळी बाबापूर फाट्याजवळ या मालगाडीचे मधले 12 डब्बे रुळावरून घसरले. लोको पायलटला (चालक) हे लक्षात येताच त्यांनी इमरजन्सी ब्रेक लावला. त्यामुळे गाडी लगेच थांबली.

लोको पायलटने तात्काळ याची माहिती मुकुटबन आणि वणी येथील अधिका-यांना दिली. अधिका-यांनी तात्काळ सूत्र हलवले. मालगाडीच्या डब्याला रुळावर चढवण्याचे काम युद्धस्तरावर सुरू होती. डबे रुळावर येताच या मार्गावरून रेल्वेगाड्यांचा प्रवास सुरू होईल. अशी माहिती स्टेशन अधिक्षक सिंग यांनी दिली.

मिळालेल्या माहितीवरून घुग्गुसवरून सोलापुर जाण्यासाठी गाडी रविवारी रात्री 11 वाजेपासूनच वणी स्टेशनवर उभी होती. इंजिन मिळाल्यानंतर संध्याकाळी 5 वाजून 25 मिनिटांनी ही मालगाडी वणी रेल्वे स्टेशनवरून निघाली होती.

हे देखील वाचा:

https://wanibahuguni.com/waninews/flat-sale-in-mankapur-nagpur/

संचारबंदीत वणीकरांच्या चिकन मटणवर उड्या…

KayarLead StoryWani Railway Station
Comments (0)
Add Comment