तरुणीला प्रपोज करून विनयभंग

मजनूवर गुन्हा दाखल

विवेक तोटेवार, वणी: 26 फेब्रुवारी रोजी तालुक्यातील भुरकी येथे एका तरुणीचा गावातीलच एका तरुणाने विनयभंग केला. तरुणीच्या तक्रारीवरून या मजनुविरुद्ध कलम 354 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शुक्रवारी दिनांक 26 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता आरोपी शंकर सुधाकर देऊळकर (21) रा. भुरकी याने त्याच गावात राहणाऱ्या एका तरुणीला भेटून तुझे लग्न होऊ देणार नाही अशी धमकी दिली व तिच्यावर प्रेम करीत असल्याचे सांगून तिचा विनयभंग केला.

पीडितेने वणी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली. तिच्या तक्रारीवरून वणी पोलिसात आरोपीविरुद्ध कलम 354 (ड), (1), (2) नुसार गुन्हा नोंद केला आहे. घटनेचा तपास ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाश गोरलेवार करीत आहे.

हे देखील वाचा:

नागपूरमध्ये करा लक्झरी फ्लॅट खरेदी

कायरजवळ मालगाडी रुळावरून घसरली

Lead StoryMolestation
Comments (0)
Add Comment