शोतोकोण कराटे अकॅडमी मुकुटबन तर्फे प्रजासत्ताक दिन साजरा

विद्यार्थ्यांनी दाखविले कराट्याचे प्रात्यक्षीक

सुशील ओझा, झरी: मुकुटबन येथे शोतोकोण कराटे अकॅडमिच्या वतीने प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. या वेळी शासनाचे संपूर्ण नियम पाळून प्रभात फेरी काढण्यात आली. या प्रभातफेरी मध्ये विद्यार्थ्यांनि विविध कराट्याचे प्रात्याक्षिक करून दाखविले.

प्रभातफेरी सुनील उत्तरवार, देवांतवार यांनी हिरवी झेंडा दाखवून प्रभात फेरीची सुरुवात केली या वेळी शोतोकोण कराटे दो स्पोर्ट्स असोसिएशन व जिल्हा किक बॉक्सिंग असोसिएशन चे जिल्हा अध्यक्ष व मुख्य प्रशिक्षक सेन्साई नितीन मनवर हे सोबत होते.

प्रभात फेरी करिता संदीप धोटे, हसन कनोजे, श्रीनिवास देवांतवार, दीपक पारशीवे, प्रफुल कडू, अतुल विधाते, मंथन उत्तरवार आदिने सहकार्य केले.

हे देखील वाचा:

सशस्त्र सेना दलात निवड झालेल्या युवक-युवतींचा प्रजासत्ताक दिनी गौरव

पैशाने कार्यकर्ते विकत घेता येत नाही: जयंत पाटील

karateLead StoryMukutban
Comments (0)
Add Comment