छबुताई गोपाळकृष्ण मार्कंडे यांचे निधन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणीतील लालगुडा रोडवरील ओम नगर येथील रहिवासी असलेल्या छबूताई गोपाळकृष्ण गोपाळकृष्ण मार्कंडे यांचे 7 मार्च रोजी नागपूर येथे निधन झाले. त्या 71 वर्षांच्या होत्या. 10 दिवसांआधी त्यांची तब्येत अचानक ढासळली होती. त्यामुळे त्यांना वणीहून नागपूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान मंगळवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. चार महिन्यांआधीच त्यांचे पती गोपाळकृष्ण मार्कंडे यांचे देखील निधन झाले होते. छबुताई यांच्या पश्चात 3 मुले, 1 मुलगी, नातवंड असा आप्त परिवार आहे. आज दुपारी 3 वाजता त्यांच्या राहत्या घरून (ओमनगर, जन्नत सेलिब्रेशन जवळ, लालगुडा रोड, वणी) त्यांची अंत्ययात्रा निघेल व मोक्षधाम येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. 

Lead StoryNidhan warta