बहुगुणीकट्टामध्ये आज देव येवले यांची दिवाळी म्हणजे ही कविता..
दिवाळी म्हणजे
दिवाळी म्हणजे
आनंदाची उधळण
स्नेहाचं बंधन
दिव्याची वरात
साऱ्याच्या घरात …
दिवाळी म्हणजे,
फटाक्याचा आवाज
नवा नवा साज
लक्ष्मीला आज …
अंधाराचा नायनाट
प्रकाशाची वाट
फराळाची लाट
संकल्पांची गाठ
साऱ्याच्या मनात …
दिवाळी म्हणजे,
प्रेम, आनंद देणे घेणे
सुख समूद्धि
घरात येणे ..
द्वेष मत्सर
मनातून जाणे..
– देव येवले
++++++++++++++++++++
वणी बहुगुणी या न्यूज पोर्टलसाठी आर्टिकल, कविता पाठवण्यासाठी, तसंच तुमच्यात असणा-या कलागुणांविषयी माहिती देण्यासाठी
संपर्क : निकेश: 9096133400
Email id: wanibahuguni.news@gmail.com