परमडोह येथे २४ डिसेंबरला यात्रा महोत्सव

0 528

विलास ताजने, वणी : वणी तालुक्यातील परमडोह गावा जवळून वाहणाऱ्या पैनगंगा नदी काठावर दि.२४ डिसेंबर सोमवारला यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. परमडोह आणि सांगोडा या दोन गावा जवळ पैनगंगेचा प्रवाह दक्षिण-उत्तर वाहिनी आहे. यामुळे या स्थळाला महत्त्व प्राप्त झाले आहे.

कै. निखाडे महाराज आणि ह.भ.प. कै. उरकुडे महाराज यांनी या यात्रेला सुरुवात केली. २४ डिसेंबरला  दुपारी १२ वाजता ह.भ.प. डाखरे महाराज यांचे कीर्तन, ३ वाजता ह.भ.प. उरकुडे महाराज यांचे कीर्तन आयोजित केले आहे. दहीहंडी आणि महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.