राजूर येथे विजेच्या धक्क्याने लाईनमनचा मृत्यू

0 2,245

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील राजूर येथील सबस्टेशनवर वीज बंद करण्यासाठी गेलेल्या एका लाईनमनचा विजेचा धक्का लागल्याने जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना आज सकाळी 7.15 मिनिटांनी घडली. घटना लक्षात येताच सुरक्षा रक्षकाने ही माहिती  अभियंता याना दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसात तक्रार दाखल करण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळात ठेकेदारी तत्वावर काम करणारे सुभाष सुधाकर मत्ते (25) राहणार सगणापूर तालुका मारेगाव हे आज सकाळी 7 वाजता दरम्यान राजूर इजारा येथे लाईन बंद करण्याकरिता गेले होते. यादरम्यान ए बी स्विचला विद्युत प्रवाह चालू असल्याने सुभाषाने हात लावताच त्याला जोरदार विजेचा धक्का लागला.

करंट इतका जबरदस्त होता की ज्यामुळे सुभाषचा जागीच मृत्यू झाला. ही घटना तेथिल सुरक्षा रक्षक भास्कर ईश्वर ढेंगळे यांच्या लक्षात आली. त्यांनी त्वरित फोन करून अभियंता राकेश कराडकर व शेषराव जाधव यांना माहिती दिली. त्यांनी सुभाषचा मृतदेव ग्रामीण रुग्णालयात आणला. घटनेचा पुढील तपास ठाणेदाराच्या मार्गदर्शनात वासुदेव नारनवरे करीत आहे. सुभाषच्या अकस्मात मृत्यूने गावात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.