टाकळी येथे विहिरीत उडी घेऊन तरूण शेतकऱ्याची आत्महत्या

0 1,419

नागेश रायपुरे, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील टाकळी (कुंभा) येथील सचिन श्रीधर आदेवार यांनी विहरीत उडी घेऊन आत्महत्या केली. आज सोमवारी ही घटना उघडकीस आली.

सचिन आदेवार (32) यांच्या वडिलांची 3 एकर शेती आहे. ही शेती सचिन करायचे. सोमवारी संध्याकाळी 6 वाजता सचिन बाजारातून घरी परत आले. त्यांनी घरी बाजार ठेवला व ते 7 वाजताच्या सुमारास शेतामध्ये गेले. त्यांच्या शेतामध्ये कपाशीचे पीक होते.

मात्र रात्र झाली तरी शेतामध्ये गेलेले सचिन घरी परत आले नाही. त्या नंतर त्याच्या भाऊ गजानन यांनी गावात माहिती दिली. रात्री 9 वाजताच्या सुमारास सचिन घरी न आल्या मुळे त्याचा आजूबाजूच्या शेतशिवारात तपास घेणे सुरू झाला. परंतु सचिन यांचा पत्ता लागला नाही.

सोमवारी सकाळी 5 च्या सुमारास पुन्हा तपास घेणे सुरू झाले असता गावातील लोकांनी सचिन यांच्या शेताच्या विहरीत गर टाकला असता तिथे सचिन यांचे शव आढळून आले.

सचिन यांच्यामागे पत्नी, सहा वर्षांचा मुलगा व चार वर्षांची मुलगी असा परिवार आहे. त्याने कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली याचे कारण अद्यापही कळू शकले नाही. त्यांच्या आत्महत्येने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.