महिलेचा विनयभंग करून प्राणघातक हल्ला

महिलेची प्रकृती गंभीर, जीवन मरणाशी झुंज सुरू

0 2,103

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील कोरंबी मारेगाव येथे एका महिलेवर विनयभंग करून तिच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून महिलेची प्रकृती चिंताजनक आहे.

पीडित महिला ही मजुरीचं काम करते. आज दुपारी मंगळवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास पीडित महिला ही एका शेतक-यांच्या शेतात कापूस वेचत होती. दरम्यान आरोपी विकास संजय बोंडे (22) राहणार कोरंबी मारेगाव हा शेताच्या बाजूने जात होता. त्या दरम्यान त्याला महिला शेतात एकटी काम करत असल्याचे दिसले. तो लगचे शेतात गेला आणि तिथे जाऊन त्याने महिलेचा हात पकडून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. महिलेने याचा जोरदार विरोध केला.

महिलेचा होणारा विरोध पाहून आरोपी आणखीन खवळला व त्याने हातातील विळ्याने महिलेच्या डोक्यावर व हातावर वार केला. महिलेने आरडाओरड करताच आरोपीने तिथून पळ काढला. दरम्यान आजूबाजूच्या शेतातील लोक गोळा झाले. त्यांना पीडित महिला जखमी अवस्थेत दिसली. तिला लोकांनी तात्काळ वणीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने तिला चंद्रपूर येथे हलवण्यात आले.

या घटनेची संपूर्ण माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी लगेच आरोपीला अटक केली. आरोपीवर कलम 354 अ, व 307 भादंवि नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक अशोक काकडे हे करीत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.