चिखलगाव येथे भव्य मोफत आरोग्य शिबिर

राष्ट्रवादी काँग्रेस आणि दुर्गा उत्सव मंडळाचा उपक्रम

0 906

बहुगुणी डेस्क वणी: चिखलगाव येथील बोधे नगर परिसरातील जय महाकाली माता मंडळ व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वणी विधानसभा शाखा चिखलगावच्या वतीने भव्य मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. उद्या मंगळवारी दिनांक 16 ऑक्टोबरला दुपारी 3 ते 6 या कालावधीत या आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे.

या आरोग्य शिबिरात विविध क्षेत्रातील वैद्यकीय तज्ज्ञांकडून सर्व रुग्णांची मोफत तपासणी करण्यात येणार आहे. तसेच रुग्णांची रक्त तपासणीही केली जाणार आहे. गरजू रुग्णांना आवश्यक त्या औषधी मोफत दिल्या जाणार आहे. बोधेनगर इथे घेतल्या जाणा-या या शिबिराचा गरजूंनी लाभ घ्यावा असे आवाहन शिबिराचे आयोजक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ. महेंद्र लोढा आणि जिल्हा सरचिटणीस स्वप्निल धुर्वे यांनी केले आहे.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जिल्हा उपाध्यक्ष राजू उपरकर, विद्यार्थी आघाडीचे तालुका अध्यक्ष सोनू निमसटकर, जिल्हा सरचिटणीस रवि येमुर्ले यांच्यासह अविनाश कातकडे, संदेश तिखट, निखिल उपरकर, अतुल इखारे, राहुल चहाणकर, आशुतोष धुर्वे, संदीप घाटे, आशिष मुके, हर्षल बोधकर यांच्यासह दुर्गा मंडळातील शेकडो कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते परिश्रम घेत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.