मुकुटबन येथे दुचाकीचा अपघात, एक ठार, एक गंभीर

अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट नाही

0 1,492

सुशील ओझा, झरी: मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या तेजापूर येथील दुचाकीचा अपघात झाला. यात एक तरुण जागीच ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. आज दिनांक ९ ऑक्टोबरला सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान ही घटना घडली.

तेजापूर येथील मंगेश अऩिल वाभीटकर (24) हा त्याचा मित्र सतीश नारायण भोयर (24) याच्यासोबत दुचाकी (mh 29, AJ 6426) घेऊन तेजापूर येथून मुकुटबन येथे येत होता. मुकुटबन येथे गुरुकुल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या समोर आबड यांच्या जुना पाणी फिल्टर प्लांटच्या समोर वणी-आदीलाबाद मुख्य मार्गावर त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. त्यात मंगेश वाभीटकर हा जागीच ठार झाला. तर सतीश हा गंभीर जखमी झाला.

सदर अपघात कशाने झाला याबाबत कुणालाच माहिती नसल्याने विविध तर्क लावले जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक नितीन चुलपार हे आपले पोलीस ताफा घेऊन घटनास्थळी पोहचले. जखमीला वणी येथे उपचारासाठी हलविले तर मृतकाचे शव शवविच्छेदनासाठी पाठविले. अपघातामुळे घटनास्थळी थोडावेळ तणावाचे वातावरण होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.