शिवणी येथील गणपत सातपुते यांचे निधन

काँग्रेसने गमावला एकनिष्ठ कार्यकर्ता

0 753
विलास ताजने, मेंढोली – वणी तालुक्यातील शिवणी (जहाँगीर) येथील प्रतिष्ठित नागरिक गणपतराव खंडूजी सातपुते यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी वृद्धापकाळाने दि. २६ बुधवारला सांयकाळी साडेपाच वाजता निधन झाले. ते कॉंग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते होते. दिवंगत माजी आमदार बापूराव पाटील पानघाटे यांचे ते अत्यंत निकटवर्ती होते.

 

शिवणीचे पोलीस पाटील ते वणी बाजार समितीचे सदस्य, संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य, वणी पंचायत समितीचे सदस्य अशी त्यांनी वेगवेगळी पदे भूषविली. त्यांच्या बिनधास्त, मनमोकळ्या स्वभावाने लोकांना ते जवळचे वाटत होते. त्यांच्यावर गुरुवारी दुपारी बारा वाजता शिवणी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

त्यांच्या मागे पत्नी, धनराज, श्रीराम, आप्पाजी, मोहनदास ही चार मुले, सुना, नातवंडे असा बराच मोठा परिवार आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.