कत्तलीसाठी तेलंगणात जाणाऱ्या चार बैलांची सुटका

0 523

सुशील ओझा,  झरी: मुकुटबन पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या जुणोनी शिवारात तेलंगाणात जाणा-या चार बैलांची सुटका केली. २५ सप्टेंबर ला दुपारी मुकुटबन पोलिसांतर्फे ही कार्यवाही करण्यात आली.

दुपारी मुकुटबन पोलीस शासकीय कामाकरिता जात असताना जुणोनी ते वल्हासा मार्गावर किसन खारकर यांच्या शेताजवळ  दोन इसम पायदळ ४ बैल तेलंगणात घेऊन जात असल्याचे आढळले. चारही जनावरबाबत विचारणा केली असता तेलंगणात नेत असल्याचे सांगितले. यावरून त्यांनी चारही बैल ताब्यात घेतले. चारही बैलाची किंमत ४५ हजार रुपये असून आरोपी नागोराव पुनाजी मडावी रा माथार्जुन व शेख जुमा शेख हसन रा बोरी यांना अटक करून पोलीस स्टेशन ला कोठडीत ठेवण्यात आले.

चारही बैलांना जुणोनी येथील कोंडवाड्यात टाकण्यात आले. सदर कार्यवाही ठाणेदार धनंजय जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार प्रवीण ताडकोकुलवार व स्वप्नील बेलखेडे यांनी केली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.