महेंद्र सिंह धोनीनं सुरू केला ‘हा’ बिजिनेस

माहिच्या नवीन शोरूमचं झालं उद्घाटन

0 501

रांची: कसोटी क्रिकेटमध्ये निवृत्त झाल्यावर कर्णधार महेंद्रसिंह धोनी काय करणार याकडे सर्वांचच लक्ष लागलं होतं. पण आता याचं उत्तर मिळालंय. धोनीनं नवीन बिझनेस सुरू केलाय. कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानं त्याच्याकडे आता बराच मोकळा वेळ असतो. या मोकळ्या वेळात त्याने नवीन बिजिनेस सुरू केलाय.

‘सेव्हन’ या नावाने माहीने स्पोर्ट्सवेअरची नवीन रेंज सुरू केलीये. याच्या पहिल्या शोरूम उद्घाटन त्याने नुकतंच रांची या शहरात करण्यात आलंय. धोनीनं याविषयीचा फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. रांची येथील न्यूक्लियस मॉलमध्ये धोनीचं हे शोरूम आहे. त्याच्या शोरूममध्ये स्पोर्ट शूज, स्पोर्टवेअर, खेळाशी संबंधित सामुग्री आणि इतर वस्तू मिळतील.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.