एकता नगरमध्ये तरुणाचा तलवार घेऊन धुमाकुळ

पोलिसांनी केली आरोपीला अटक

0 1,472

विवेक तोटेवार, वणी: वणीतील एकता नगर परिसरात तलवार घेऊन फिरणाऱ्या एका तरुणास गुरुवारी दुपारी वणी पोलिसांनी अटक केली आहे.

गुरुवारी दुपारी 12.30 ते 1 वाजताच्या दरम्यान वरोरा रोडवरील नगर परिषदेच्या गाळ्यासमोर एक इसम हातात तलवार घेऊन धुमाकूळ घालत असल्याची माहिती वणी पोलिसांना मिळाली. माहितीवरून वणी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन फैजन खान आबेद खान (21) राहणार रंगरिपुर वणी यास शास्त्रासह अटक केली.

त्याच्यावर कलम 4/25 आर्म्स ऍक्ट नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो कॉ सुदर्शन वानोळे करीत आहे. सदर इसम हा हातात तलवार घेऊन का फिरत होता याबाबत अद्यापही कोणतीही माहिती मिळू शकली नाही.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.