साखरा येथील प्रभाकर बोबडे यांचे निधन

0 541

विलास ताजने, मेंढोली: वणी तालुक्यातील साखरा (कोलगाव) येथील तंटामुक्त समीर अध्यक्ष तथा शिवसेना कार्यकर्ते प्रभाकर आनंदराव बोबडे यांचे दि.९ गुरुवारला दीर्घ आजाराने निधन झाले. ते ५२ वर्षांचे होते. त्यांच्यावर चंद्रपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू होते.

त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली, जावई आणि बराच मोठा परिवार आहे. पैनगंगा नदीकिनारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सदस्य संजय निखाडे यांच्या अध्यक्षतेखाली शोकसभा पार पडली. जिल्हा परिषद सदस्य परसराम पेंदोर, माजी. जि. प. सदस्य विजय पिदूरकर, शिवसेनेचे दीपक कोकस, शांताराम उपासे यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या. बोबडे यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.