अल्पवयीन विद्यार्थीनीचे अपहरण; आरोपी फरार

मुला मुलीच्या शोधात वणी पोलीस

0 1,011

विवेक तोटेवार, वणी: शाळकरी मुलगी घरी न परतल्याने तिचे अपहरण झाल्याची तक्रार मुलीच्या वडीलांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. वणीत मंगळवारी 31 जुलै रोजी दुपारी 4.30 वाजताच्या दरम्यान ही  घटना घडली. सदर मुलगी जनता शाळेत 10 व्या वर्गात शिक्षण घेत आहे. सध्या अपहरण करणारा तरुण फरार असून वणी पोलीस त्याचा कसून शोध घेत आहे.

मुलगी ही राजूरची रहिवाशी आहे. मंगळवारी सकाळी शाळा संपल्यानंतर 1 वाजता ती राजूरला तिच्या घरी परतली. दुपारी 3 वाजता तिची वणीला शिकवणी होती. त्यामुळे ती शिकवणी वर्गासाठी राजूर येथून ऑटो ने निघाली. परंतु सायंकाळी ती परत आली नाही. मुलगी घरी न परतल्याने मुलीचे वडील चिंतीत झाले.

तिच्या वडीलांनी तिच्या शिकवणी वर्गात जाऊन माहिती काढकी असता ती शिकवणी वर्गात आलीच नसल्याचे समजले. त्यावेळी पालकांची चिंता वाढली व त्यांनी शोधाशोध घेण्यास सुरुवात केली. दुपारी 4.30 वाजताच्या दरम्यान किरणच्या आजोबाला ती वणी येथिल टिळक चौकात सादिक शेख याच्या ऑटोत बॅग घेऊन बसलेली दिसली होती.

त्या मुलीसोबत सादिक शेख (20) राहणार राजूर हा होता. शोध घेतला असता सादिक हा राजूर येथे नव्हता. त्यामुळे सादीकनेच मुलीचे अपहरण केल्याचा आरोप मुलीच्या वडीलांनी केला आहे. मुलीच्या पालकांच्या तक्रारीवरून वणी पोलिसांनी सादिक विरुद्ध कलम 363, 366 नुसार गुन्हा नोंद केला आहे. घटनेचा पुढील तपास पो उ नि वाकडे करीत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.