वणीत एकाच दिवशी दोन आत्महत्या

युवक व युवतीच्या आत्महत्येने चर्चेला पेव

0 2,369

विवेक तोटेवार, वणी; वणीतील रंगनाथ नगर भागात शनिवारी सकाळी दोन आत्महत्या झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये एक युवक व एक अल्पवयीन मुलगी आहे. दोघेही वणीतील रंगनाथ नगर मध्ये राहत असल्याची माहिती आहे.

शनिवारी 28 जुलै रोजी वणी शहर हादरून निघाले. तालुक्यातील रंगनाथ नगर वार्ड क्रमांक 15 मध्ये राहणाऱ्या रोहित राजेश्वर दुपारे (17) याने कोंडना वाडी येथील नागमंदिराजवल सकाळी 8 वाजताच्या दरम्यान गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविली.

तर याच भागात राहणारी युवती दिव्या अनिल जाधव (16) हिने ही आपल्या घरीच गळफास लावून आत्महत्या केली. दिव्या हिला वडील नसून एक भाऊ व एक बहीण असल्याची माहिती आहे. आत्महत्या करण्याच्या अगोदर आपल्या भावासोबत काही कारणावरून वाद झाल्याची माहिती आहे. परंतु रोहितच्या आत्महत्यचे कारण समजू शकले नाही.

दोघेही एकाच वार्डात राहत असल्याने जनतेत वेगवेगळ्या चर्चेला पेव फुटले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचून दोघानाही शवविच्छेदना करिता वणीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी पोलीस ठाण्यात मर्ग दाखल केला आहे. आत्महत्येच्या कारणाचा तपास वणी पोलीस करीत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.