विठ्ठलवाडी येथील शेतक-याची आत्महत्या

0 899

विवेक तोटेवार, वणी: विठ्ठलवाडी येथे राहणारे शेतकरी बाबाराव गोविंद उरकुडे (42) यांनी द्वारकानगरी, निमकर ले आऊट येथे आत्महत्या केली. आज सकाळी ही घटना उघडकीस आली. त्यांनी कर्जबाजारीपणामुळे कीटकनाशक प्राषण करून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

मृतक बाबाराव गोविंदराव उरकुडे हे विठ्ठलवाडी येथे राहतात. त्यांची वडगाव रस्त्यावर शेती आहे. सोमवारी बाबाराव त्यांच्या दुचाकीने शेतात गेले होते. मात्र रात्री ते परतलेच नाही. सकाळी जेव्हा त्यांचा शोध घेतला असता. शेतालगत त्यांचा मृतदेह आढळून आला.

मृतकाच्या शेजारी 2 कीटकनाशकाच्या बाटल्या आढळून आल्या. त्यामुळे. त्यामुळे विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याचा कसाय बांधला जातोय. ते कर्जबाजारी असल्याने त्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलले असे त्यांच्या आप्तसंबंधीयांकडून कळतये. घटनेचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल भादीकर हे करीत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.