राजूरमध्ये विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप

राष्ट्रीय प्राथमिक शाळेचा उपक्रम

0 482

महेश लिपटे, राजूर: वणी तालूक्यातील राजूर कॉलरी येथील राष्ट्रीय प्राथमिक शाळा येथे राष्ट्रीय शिक्षण संस्था वणीच्या वतीने विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष सुरपाम व सदस्य मोरे, यांची प्रमुख उपस्थिती होती. यांच्या हस्ते उपस्थित विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, दप्तर, पुस्तकांचे वाटप करण्यात आले.

या शाळेत दरवर्षी गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व गणवेश वाटप केला जातो. यावेळी राष्ट्रीय विद्यालय, राजूरचे मुख्याध्यापक येरगूडे, आसुटकर, बोबडे यांची उपस्थिती होती. या मान्यवरांनी विद्यार्थांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करून कार्यक्रमाचा समारोप झाला.

कार्यक्रमाचे संचालन राष्ट्रीय प्राथमिक शाळा, राजूरचे मुख्याध्यापक लिपटे यांनी केले. तर आभार प्रदर्शन कु. आवारी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोहितकर, जितेंद्र बोदाडकर यांनी परीश्रम घेतले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.