वणीत शुक्रवारी कालिदास दिनाचे आयोजन

0 369

सुरेंद्र इखारे, वणी: महाकवी कालिदास यांना अभिवादन करण्यासाठी शु्क्रवारी वणीमध्ये कालिदास दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. संध्याकाळी 7 वाजता आंबेडकर चौकातील नगर वाचनालय येथे हा दिन साजरा होईल. मेघदूत या काव्यातील उल्लेखाच्या आधारे आषाढाच्या पहिल्या दिवशी कालिदास दिनाचे आयोजन करण्यात येते.

कविकुलगुरू कालिदासांना अभिवादन करण्यासाठी जैताई देवस्थान, नगरवाचनालय, संस्कृत भारती आणि लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या संस्कृत विभागाद्वारे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी प्रा. स्वानंद पुंड हे कालिदास विरचित रघुवंशम् महाकाव्याच्या पाचव्या सर्गावर निरूपण करतील. वणीकर संस्कृत प्रेमीजनांनी अधिकाधिक संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.