शिंदोला येथे रस्ता बांधकामाचे भूमिपूजन

एसीसीच्या पुढाकाराने रस्त्याचे काँक्रीटीकरण

0 614
विलास ताजने, (वणी): वणी तालुक्यातील शिंदोला ते कळमना या आठ कि.मी. रस्त्यापैकी १२५० मीटर रस्ता बांधकामाचे भूमिपूजन आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या हस्ते नुकतेच पार पडले.
शिंदोला ते कळमना या रस्त्यावर शिंदोला गावालगत प्रचंड प्रमाणात खड्डे पडले आहे. सदर मार्गाने गोवारी येथून सिमेंटचा कच्चा माल वाहतूक केला जातो. या मार्गाच्या दुरूस्तीकडे बांधकाम विभाग आणि एसीसी एकमेकांकडे अंगुलीनिर्देश करीत होते. त्यामुळे सदर रस्ता भागाची दयनीय अवस्था झाली आहे. परिणामी शिंदोला गावातून वाहतुक सुरू आहे.त्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली होती.
नुकतेच सिमेंट कंपनीच्या अर्थसहाय्यातून सदर रस्त्यावरील १२५० मीटर रस्ता बांधकामाचे भूमिपूजन आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सिमेंट कंपनीचे अधिकारी दामसिघर रेड्डी, सिंग, विजय खटी, माजी जि.प.सदस्य विजय पिदूरकर, सरपंच विठ्ठल बोन्डे, शांताराम राजूरकर, शांतीलाल जैन, विजय गारघाटे, लुकेश्वर बोबडे, तुकडोजी पिंपळशेंडे, रामदास कोल्हे, विलास सावे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.