मजरा (हिवरा) ते राजूर पांदण रस्त्याचे भूमिपूजन

0 618

विवेक तोटेवार, वणी: बुधवारी मजरा ते राजूर या पांदण रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस डॉ. महेंद्र लोढा यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. लोकसहभाग आणि डॉ. लोढा यांच्या सहकार्यातून हा रस्ता तयार होत आहे.

मजरा ते राजूर या मार्गावर परिसरातील अनेक शेतक-यांच्या शेती आहे. मात्र इथे रस्ता नसल्याने पावसाळ्यात शेतात जाण्यासाठी शेतक-यांना मोठी कसरत करावी लागायची. रस्त्यावर चिखल होत असल्याने बैलगाडीला देखील इथून जाणं येणं करणं जिकरीचं होतं. सोबतच राजूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असल्याने या भागातील लोकांना आरोग्य केंद्रात चिखल तुडवून जावे लागायचे किंवा मग 16 किलोमीटरचा फेरा मारून जावे लागायचे. मात्र आता मजरा-राजूर हा रस्ता तयार होत असल्याने हे अंतर केवळ अडीच ते तीन किमीचे होणार आहे.

बुधवारी संध्याकाळी पाच वाजता डॉ. महेंद्र लोढा यांच्या हस्ते रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. लवकरच या रस्त्याचे काम पूर्ण केले जाणार आहे. यावेळी सरपंच सुरेखा देउळकर,ज्ञानेश्वर कसारे, जीवन खिरटकर, अनिल मनोहर देऊळकर, स्वप्निल महारतळे, प्रफुल्ल मोहितकर, निलेश काकडे, दत्ता देऊळकर, दिलिप पानघाटे,  अरुण सूर्यवंशी आणि गावकरी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.