वणीत बसपातर्फे 26 जूनला कार्यकर्ता मेळावा

मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

0 495

विवेक तोटेवार, वणी: छत्रपती शाहु महाराज जयंती निमित्त बहुजन समाज पक्षातर्फे मंगळवार दिनांक 26 जूनला वणीत कार्यकर्ता मेळावा व अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम विठ्ठल रखुमाई भवन इथे संध्याकाळी 4 वाजता होणार आहे. यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जय्यत तयार सुरू केली आहे.

बहुजन समाज पक्ष हा एक राष्ट्रीय पक्ष असून विषमतावाद, मनुवाद यासा सडेतोड उत्तर देण्यासाठी व सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी व बहुजन समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत मानवतावादी चळवळीचा प्रशिक्षीत कार्यकर्ता तयार व्हावा, या उद्धेशाने बसपा वणी विधानसभेच्या वतीने छत्रपती शाहु महाराज जयंती निमित्त कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यकर्ता मेळावा, कुटुंब मेळावा व स्नेहभोजनास उपस्थित राहण्याचे आवाहन बसपाच्या वतीने करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून बसपा प्रदेश सचिव पंडीत दिघाडे, बसपा जिल्हाध्यक्ष तारिक साहिर लोखंडवाला, जिल्हा प्रभारी प्रकाश राऊत व राजेंद्र कांबळे, अशोक वानखेडे माजी पंस सदस्य, पुष्पाताई आत्राम, वृषाली खानझोडे माजी उपसभापती पं.स. वणी असणार आहेत. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन ऍड राहुल खापर्डे, जितेंद्र डाबरे, अनिल भोंगाडे, संदीप खोब्रागडे, प्रवीण खानझोडे, सुरेंद्र पुडके, प्रशांत डांगरे, राकेश वाघमारे, मनोज जीवने आणि बसपाचे कार्यकर्ते आणि पदाधिका-यांनी केले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.