युवकावर जीवघेणा हल्ला, आरोपी फरार

0 1,019

विवेक तोटेवार, वणी; रविवारी सकाळी 10 वाजताच्या सुमारास वणीतील दीपक चौपाटी परिसरात एका युवकावर तीन जणांनी हल्ला केला.यात युवक गंभीर जखमी झाला आहे. याबाबत जखमीच्या भाच्याने वणी पोलिसात तक्रार दिली आहे. तक्रारीवरून वणी पोलिसात सादर तिन्ही मारेकऱ्यांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

रविवारी सकाळी गजानन रामचंद्र काकडे (38) याला काही कारणावरून राहुल ठेंगणे (24), पानघाटे (26) व एक इसमाने लाथा बुक्याने बेदम मारहाण केली. ज्यामध्ये गाजनाच्या डोक्याला गंभीर इजा झाली आहे. त्याला त्वरित वणीतील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. रक्तस्राव अधिक झाल्याने गजानन याला चंद्रपूर येथे हलविण्यात आल्याची माहिती आहे.

मारहाण करण्याचं कारण अद्याप कळू शकलं नाही. मात्र मारहाण केली तेव्हा पीडित आणि आरोपी हे सर्व मद्यप्राशन करून असल्याची माहिती आहे. जखमीचा भाचा संदीप कोल्हे याने दिलेल्या तक्रारीवरून तिन्ही आरोपींवर कलम 324, 34 भा द वि नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जयप्रकाश निर्मल करीत आहे. वृत्त लिहतपर्यंत आरोपींना अटक करण्यात आली नव्हती.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.