रस्त्यावर अडवून विवाहित महिलेचा विनयभंग

अनैतिक संबंध ठेवण्यासाठी मागितला मोबाईल नंबर

0 1,043

विवेक तोटेवार, वणी; एका महिलेला गुरुवारी सकाळी 10.30 वाजता रस्त्यात अडवून तिचा विनयभंग केल्याची घटना शहरात घडली आहे. सदर महिला ही कपडे शिलाईचे काम करीत असून अंगणवाडी मदतनीस म्हणून काम पाहते. मागील अनेक महिन्यापासून आरोपीची महिलेवर वाईट नजर होती. या घटनेअगोदारही आरोपीने विनयभंग करण्याचा प्रयत्न केला होता. याची कबुली पीडित महिलेने दिली आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरून आरोपीवर वणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पीडित महिला ही आपल्या पतीपासून आपल्या 10 वर्षीय मुलीला घेऊन वेगळी राहते. पीडित ही कपडे शिवून आपल्या संसाराचा गाडा खेचत आहे. आरोपी अभय निरंजन दारुंडे (40) राहणार नवरगाव तालुका मारेगाव हा पीडितेच्या भावाचा मित्र असून पीडित महिला त्याला ओळखते. यागोदरही आरोपी हा 30 एप्रिलला पीडितेच्या घरी रात्री 10.30 वाजता आला होता. परंतु त्यावेळी पीडितेने त्याला धुडकावून लावले. परंतु गुरुवारी 14 जून रोजी आरोपीने हा महिलेचा संताजी शाळेपुढे रस्ता रोकला. यावेळी अभय हा दारूच्या नशेत होता.

त्याने पीडितेला म्हटले की, ‘मला तुझ्यासोबत संबंध ठेवायचे आहे करीता तु तुझा मोबाईल नंबर दे’ पीडितेने त्याच्या मागणीचा विरोध केला. तर अभयने महिलेचा त्याच ठिकाणी हाथ पकडून विनयभंग केला. व जर पीडितेने संबंध ठेवले नाही तर त्याने पिडितेच्या मुलीला मारून टाकण्याची धमकी दिली. या धमकीने घाबरून पीडितेने वणी पोलिसात तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीवरून आरोपी अभयवर कलम 354, 341 व 506 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मुरलीधर गाडामोडे करीत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.