शेकडो विद्यार्थ्यांनी घेतला ऑनलाईन निकालाचा लाभ

0 402

विवेक तोटेवार, वणी: दिनांक 30 मे बुधवारी 12 वीचा निकाल लागला. त्यामित्त राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे वणी आणि परिसरातील विद्यार्थ्यांसाठी मोफत निकाल आणि मार्कसिटची प्रत काढण्याची सुविधा देण्यात आली. यात 300 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घेतला. दुपारी 1 वाजता राष्ट्रवादीचे जनसंपर्क कार्यालयात राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटनीस डॉ. महेंद्र लोढा यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. निकाल बघण्यासाठी आणि मार्कसिटची प्रत घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी राष्ट्रवादीच्या जनसंपर्क कार्यालयात एकच गर्दी केली होती.

निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. लवकरच विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे सत्कार करण्यात येणार आहे.

ही सुविधा गुरुवारी देखील सुरू राहणार आहे. गुरुवारी सकाळी 10 ते रात्री 8 पर्यंत विद्यार्थ्यांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटनिस डॉ. महेंद्र लोढा, सूर्यकांत खाडे, राजाभाऊ बिलोरिया, सोनू निमसटकर, संजय पेचे, स्वप्निल धुर्वे यांनी केले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.