मारेगाव तालुक्यातील 5 ग्रा.पं. पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर

जाचक अटींमुळे सदस्यपदाच्या अनेक जागा रिक्त

0 705

मारेगाव: नुकत्याच पार पडलेल्या ग्राम पंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीत रिक्त असलेल्या पाच ग्रा.पं.च्या पोट निवडणुकीचा निकाला 28 में रोजी जाहिर झाला. स्थानिक कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात हा निकाल जाहीर करण्यात आला.

यामध्ये घोड़दरा ग्रा.पं.च्या सरपंच पदी विनोद केशव आत्राम, तर सदस्य सुनील हिवरकर, नलु धोबे, चि. बोटोनी ग्रा.पं.च्या सदस्य पदाकारिता तारा विठल किनाके, गोंडबुरांडा ग्रा.पं.मध्ये सरपंच पदाकारिता चरणदास रावजी रामपुरे तर सदस्य पदी विजय रामकृष्ण राजुरकर, सुनील नीळकंठ सिडाम, ग्रा,पं. म्हसदोड़क सरपंच पदाकारिता निर्मला अय्या आत्राम तर सदस्य पदी जीवन शंकर डाखरे, विठल सुरेश टेकाम, खड़की बुरांडामध्ये ग्रा.पं. सरपंच पदी भाष्कर शिवराम आत्राम, सदस्य पदी सचिन वामन वासेकर हे उमेदवार विजय झाले.

कागदपत्राच्या जाचक अटी मुळे अनेकानी या पोट निवडणुकीकडे पाठ फिरवल्याने अनेक ग्रा.पं.च्या सदस्य पदाच्या जागा रिक्त आहे. या निवडणूक प्रक्रियीचे काम निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीदार विजय साळवे, व्ही.बी.दासरवार यांनी काम पाहिले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.