मांगली येथील शेतमजुराचा वीज पडून मृत्यू

0 675

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मांगली येथील शेतमजुराचा 6 मे रोजी  सायंकाळी 6 वाजताच्या  दरम्यान वीज कोसळून मृत्यू झाला . येथील शेतकरी अंकलेश गोरे यांच्या शेतातून काम करून बैल घेऊन परत येत असताना अचानक आलेल्या पावसात वीज पडल्याने शेतमजूर संभा लेतू टेकाम (45) रा. मांगली (नवीन)  यांचा जागेवर मृत्यू झाला.

 

या घटनेची वार्ता गावात पसरताच घटनास्थळी गावकऱ्यांनी धाव घेतली. मृतकाच्या मागे पत्नी, व तीन मुले असून मृतकाच्या कुटुंबियांना  शासनाकडून मदत मिळावी अशी मागणी होत आहे. घटनेची माहिती महसूल व पोलीस विभागांना देण्यात आली. वृत्त लिहेपर्यंत कोणतेही अधिकारी ,कर्मचारी आले नव्हते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.