राजूरजवळ दुचाकीला अपघात, 2 जखमी

0 1,157

वणी/ विवेक तोटेवार: रविवारी दुपारी 12 .30 वाजताच्या दरम्यान दोन इसम वाणीवरून पांढरकवडा जात होते. त्याचवेळी समोरुन येणाऱ्या  चारचाकी वाहनाला राजूरजवळ दुचाकीला धडक दिली. ज्यात दोन इसम जखमी झाल्याचे वृत्त आहे.

सविस्तर वृत्त असे की, सैय्यद खलील सैय्यद जलाल (38) व अनिल बापूराव वाघाडे (45) दोन्ही राहणार पांढरकवडा हे वणीतील काम करून दुचाकी क्रमांक एम एच 29 ए एक्स 6453 ने पांढरकवडा परत जात होते. त्याच वेळी यवतमाळ कडून वणीला चारचाकी वाहन क्रमांक एम एच 26 ए एफ 5445 येत होते. त्यावेळी चारचाकी वाहन चालक उमेश महादेव राठोड (30) राहणार चंद्रपूर याला डुलकी आली. डुलकी आल्याने वाहन विरुद्ध दिशेने जाऊन दुचाकीला धडकले. ज्यामध्ये दुचाकी चालक सैय्यद खलील याला गंभीर दुखापत झाली. त्याच्या उजव्या पायाला व डोक्याला दुखापत झाली.

धडक इतकी जबरदस्त होती की चालकाच्या उजव्या पायाची दोन बोटे तुटून खाली पडली. अनिलही या अपघातात जखमी झाला आहे. जखमींना वणीतील एका खाजगी रुग्णालयात उपचरासाठी दाखल करण्यात आले आहे. चारचाकी वाहनाचा चालकाला याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर कलम 279 व 337 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पो उ नि मुरलीधर गाडामोडे करीत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.